breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण
मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी”, असं आवाहन त्यांनी केलं आहे.