Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांसाठी १२७ कोटींचे नवे हेलिकॉप्टर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/helicopter.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सिर्कोस्की कंपनीच्या नव्या हेलिकॉप्टरकरिता १२७ कोटी रुपयांची तरतूद करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला. यापूर्वीही सरकारकडे सिर्कोस्की कंपनीचेच हेलिकॉप्टर होते.
दरम्यान, अपघातानंतर नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे ठरल्यानंतर ज्या निविदा आल्या, त्यात किंमत व तंत्रज्ञान याचे निकष पुन्हा सिर्कोस्की कंपनीनेच पूर्ण केल्याने आता पुन्हा त्याच कंपनीकडून नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे. तसेच या हेलिकॉप्टरसोबत त्याच्या डागडुजीचे सामनही खरेदी करण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरची २० टक्के किंमत आधी भरण्यात येणार असून उर्वरित रक्कम जुलैमध्ये भरण्यात येणार आहे.