Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करणार
औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर जाणार असून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी गावात समृद्धी महामार्गाची करणार पाहणी करणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाची पाहणी करण्याकरता उद्धव ठाकरे जाणार आहेत. आज दुपारी दोन वाजता ते पाहणी करतील.
फडणवीस सरकारचा अतिमहत्त्वकांक्षी ठरलेला प्रकल्प म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग. हा महामार्ग मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग व्यापार यांना चालना देणारा असणार आहे. सध्या मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी ८१२ किमीचं अंतर कापण्यासाठी १४ तास लागतात. मात्र, या महामार्गामुळे ८ तासांत मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होणार आहे.





