breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं; धडकेत 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

महाईन्यूज | मुंबई

भरधाव कार फूटपाथवर चढून झालेल्या अपघातात 23 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात काल रात्री (6 डिसेंबर) हा अपघात घडला आहे. अपघाताच्या वेळी कारचालक मद्याच्या अंमलाखाली असल्याचा आरोप आहे.चुनाभट्टी परिसरात राहणारी 23 वर्षीय अर्चना पार्टे काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास फूटपाथवरुन चालत होती. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या अॅक्सेंट कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार अनेक वाहनांना उडवत थेट फूटपाथवर गेली. त्यावेळी मार्केटमध्ये जाणाऱ्या तिघी जणींना कारची जोरदार धडक बसली होती.

ही धडक इतकी जोऱ्यात होती, की अर्चनाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी कारचालकाने मद्यप्राशन केल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, चुनाभट्टी पोलिस चौकीला पार्ठे कुटुंबाने घेराव घालत ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत वाहन चालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृत्यू अर्चना पार्टेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आणि चुनाभट्टीतील रहिवाशांनी नकार दिला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती असून चुनाभट्टी पोलिस (Chunabhatti Car Accident) या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button