Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बँक कर्मचाऱ्यांचा बुधवारी संप

विजया बँक आणि देना बँक यांच्या बँक ऑफ बडोदामधील प्रस्तावित विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी विविध बँकांचे जवळपास दहा लाख कर्मचारी २६ डिसेंबरला, बुधवारी संपावर जाणार आहेत. नाताळच्या सुटीला जोडून पुकारलेल्या या संपामुळे वर्षसमाप्तीआधी बँक व्यवहार थंडावणार आहेत.

विलीनीकरणाविरोधाबरोबरच आपल्या वेतनविषयक मागण्यांसाठी सरकारी बँकांच्या अधिकारी संघटनांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप केला होता. त्यापाठोपाठ कर्मचाऱ्यांचाही हा संप होत आहे. त्या दिवशी कर्मचारी संघटना मोर्चा काढणार असून मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत.

सरकारने विजया बँक व देना बँक या दोन सरकारी बँकांच्या बँक ऑफ बडोदात विलीनीकरणाची घोषणा केली होती. हे विलीनीकरण या बँकांच्या किंवा बँक ग्राहकांच्या हिताचे नाही; किंबहुना हे घातक आहे, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने  म्हटले आहे.यूएफबीयू ही ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स यांच्यासह ९ संघटनांची शीर्षस्थ संघटना आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button