Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत – दक्षिण आफ्रिका तिसरा टी -२० सामना केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?

India vs South Africa Live Streaming Details : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली ५ टी -२० सामन्यांची मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होत. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन केलं आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना लाईव्ह केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना हार्दिक पांड्याने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ गडी बाद १७५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ७४ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला.

हेही वाचा –  जळगावहून पुण्याला एक्स्प्रेस हायवेने फक्त तीन तासांत पोहोचता येणार…!

मालिकेतील दुसरा सामना मुल्लानपूरमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली होती. या दमदार खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २१३ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १६२ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना ५१ धावांनी आपल्या नावावर केला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी -२० सामना १४ डिसेंबरला हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा तिसरा सामना स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button