पुण्यात १२ अल्पवयीन मुलींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Rape.jpg)
पुण्यातल्या लोहगाव भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षकाने १२ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विमातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम पोतदार असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत पदवीधर शिक्षक विक्रम पोतदार हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने मागील सहा महिन्याच्या कालावधीत शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलींना एका खोलीत घेऊन दम देत कोणाला काही सांगायचे नाही. असे सांगून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या सहा महिन्यात तब्बल १२ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली असून या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शाळेतील इतर मुलींकडे देखील चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
या सगळ्या मुली ११ ते १२ वर्षे वयोगटातल्या आहेत असे समजते आहे. शिक्षक विक्रम पोतदार या मुलींना धमकावत असे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेतल्या इतर मुलींकडेही चौकशी केली आहे.