Breaking-newsक्रिडा

मारिया शारापोव्हाची फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार

दोन वेळा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शारापोव्हाच्या खांद्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती, मात्र या दुखापतीमधून शारापोव्हा अजुनही सावरली नाहीये. अखेरीस तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

“आयुष्यात योग्य निर्णय घेणं नेहमी सोपं नसतं. मी सरावाला सुरुवात केली आहे. हळूहळू खांद्याची दुखापत बरी होते आहे. पण पूर्णपणे सावरण्यासाठी मला थोडा अजून कालावधी लागेल.” शारापोव्हाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना संदेश दिला.

काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली शारापोव्हा जानेवारी महिन्यापासून टेनिस खेळत नाहीये. त्यामुळे शारापोव्हा दुखापतीमधून सावरत मैदानात कधी पुनरागमन करतेय याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button