Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे विद्यापीठ चौकातील गोळीबार प्रकरणी एकजण ताब्यात

पुणे :-  पुणे विद्यापीठ चौकात एका युवकावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका युवकाला ताब्यात घेतले आहे. पानटपरीचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेला सांगितल्याचा संशयावरून हा गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

शुक्राचार्य मांडले असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव असून सागर येनपुरे असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पानटपरीचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेला सांगितल्याचा संशयावरून हा गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. गोळीबार करून ते दोन्ही युवक सांगवीच्या दिशेने फरार झाले. चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button