Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
पहिलीच्या वर्गात शिकणा-या मुलीचा विनयभंग; शिपाई अटकेत

पहिलीच्या वर्गात शिकणारी सहा वर्षीय शाळकरी मुलगी स्वच्छतागृहात गेली असता तीच्या पाठीमागे जाऊन तिला पकडणा-या शाळेतील शिपायाला येरवडा पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (4 जुलै) दुपारी 3 वाजता येरवड्यातील एका शाळेत घडली.
पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. अनिल नागम्मा येमतेकर (वय-47ष रा.संगमवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पीडित मुलगी शाळेतील स्वच्छतागृहात गेली असता आरोपी तिच्या पाठीमागे गेला आणि तिचा विनयभंग केला.. पीडित मुलीने याची माहिती आईला दिल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमारे करीत आहेत.





