breaking-newsमहाराष्ट्र

धक्कादायक! कोयत्यानं कापलं आधी स्वतःचं गुप्तांग नंतर गळा चिरून तरुणानं केली आत्महत्या, भर बाजारपेठेत थरार

येवला: एका तरुणानं स्वत:चं गुप्तांग आणि गळ्या चिरून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी येवला शहरात घडली. भर बाजार पेठेत गर्दी असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्यानं खळबळ उडली आहे. मुकेश परदेशी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, मुकेश परदेशी हा हातात कोयता घेऊन भर बाजार पेठेत गर्दी असलेल्या ठिकाणी आला होता.

लोकांना काही कळण्याच्या आतच त्यानं कोयत्यानं अगोदर आपलं गुप्तांग कापलं नंतर गळा चिरला. हा प्रकार पाहून लोकांमध्ये भीती पसरून पळापळ झाली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला तातडीनं रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं आहे. मुकेश परदेशी हा तरुण पेशानं पेंटर होता. त्यानं स्वत:चं गुप्तांग कापून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button