देवेंद्र फडणवीस यांनी हातात बुट घेत केलं भाषण…राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी लिहीली फेसबुक पोस्ट…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/000-3.png)
पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या उपोषणासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाषण करत राज्य सरकारवर टीकादेखील केली. मात्र व्यासपीठावरील देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत देवेंद्र फडणवीस हातात बूट घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावत टीका केली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-624.jpg)
रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं वाटत असेल, म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले असा टोला लगावला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-28.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-63.png)
फेसबुक पोस्ट…
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणून सांगत होतात. प्रत्येक भाषणात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, हे ढोल बडवत सांगत होतात. चक्क आपण आज आंदोलनात सहभागी झालात. आपल्याच लोकांवर विश्वास नाही. चोरांच्या टोळीत बसलोय की काय, असा विश्वास वाटत असेल म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले. विरोधात आहेत मान्य आहे, पण महाविकासआघाडी सत्तेत येऊन महिनाच झाला आहे. पाच वर्षातील तुमच्या सत्तेतील हिशोब द्या”
रुपाली चाकणकर यांनी लिहीलेली पोस्ट आणि फडणवीस यांचा फोटो दोन्हीही चांगलेच चर्चेत आलेत…