दुर्दैवी! बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/water-०..jpg)
सांगली: कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून ओढ्याच्या पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू झालेला आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास आटपाडी येथील सोमेश्वरनगर परिसरातील शुक ओढा येथे घडलेली आहे. राणी चंद्रकांत पारसे (वय ३०) आणि पृथ्वीराज उर्फ दादा चंद्रकांत पारसे (वय १०) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राणी पारसे या आज सकाळी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला सोबत घेऊन कपडे धुण्यासाठी शुक ओढ्यावर गेल्या होत्या.
यावेळी खेळता खेळता पाय घसरून मुलगा ओढ्यात पडला गेला. हा प्रकार लक्षात येताच आई राणी यांनी आरडाओरडा केला. यानंतर मुलाला वाचवण्यासाठी त्या स्वतःच पाण्यात उतरल्या असता, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या प्रवाहासोबत वाहून गेल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी माय-लेकास वाचवण्यासाठी धाव घेतली आहे. मात्र, यात यश आलेले नाही. दोघांच्या शोधासाठी सांगली येथून बोटी मागवल्या आहेत. दुपारी दोनच्या सुमारास राणी यांचा मृतदेह घटनास्थळापासून ५० ते ६० मीटर अंतरावर सापडला, तर मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.