Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळपत्रक अखेर जाहीर, अशा होणार परीक्षा

पुणे / महाईन्यूज

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे.

अनेक दिवसांपासून या परीक्षांच्या वेळापत्रकाची सर्वांनाच प्रतिक्षा होती. या परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० व दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रात होणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने गही परीक्षा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परिक्षेचं वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेलं आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार की ऑफलाइनच होणार? याची चर्चा सुरू होती. मात्र, परीक्षेला अद्याप दोन महिने असून, परिस्थितीनुसार परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाने तीन दिवसांअगोदर दिलं होतं.

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये घेतल्या जाणार आहेत. परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने काही जिल्ह्य़ांतील शाळा-महाविद्यालये काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार याची चर्चा विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये सुरू झाली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button