दहावीचा पहिलाच पेपर फुटला; परीक्षेआधीच ‘Whats App’ वर व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-31.png)
जळगाव | महाईन्यूज|
महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवारपासून म्हणजे आज पासून सुरू झाली आहे. या परीक्षेचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथे घडला आहे. पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सएपवर व्हायरल झाली असल्यांच म्हटलं जातय.
कुऱ्हाकाकोडा येथील शिवाजी हायस्कुलमध्ये हा प्रकार घडला असून त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मराठीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सएपवर व्हायरल झाली. काही तरुणांनी शिक्षकांच्या मदतीने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. एक तरुण व्हाट्सएपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे परीक्षा केंद्राबाहेर शोधत असताना हा प्रकार उजेडात आला.