Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे एका रूग्णाचा मृत्यू

पिंपरी | पिंपरी-चिंचवडमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारामुळे पहिला मृत्यू झाला आहे. पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षीय युवकाला २१ जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. या रूग्णाला गुईलेन बॅरे सिंड्रोम नंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गुईलेन बॅरे सिंड्रोमनंतर या रुग्णाला न्यूमोनियाही झाला होता. न्यूमोनियामुळे श्वसनसंस्थेवर आघात झाला. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने आणि गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने मृत्यू झाल्याची कारणे समितीने दिली आहेत. शहरात आजपर्यंत १३ रुग्ण गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे आढळले होते. त्यापैकी काही रुग्ण बरे झाले आहेत. तर, काहींवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा  :  ‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले’; मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान 

हेल्पलाईन सुरू

गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, नागरिकांच्या शंकेचे निरसन व्हावे यासाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईन २४ तास सुरू आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध असतील. या आजाराबाबत चौकशी करण्याकरिता नागरिकांनी ७७५८९३३०१७ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button