Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
ठरलं एकदाचं : एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/khadse-pawar-1.jpg)
मुंबई – उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. मागील काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेनं वेग घेतला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तांवर शिक्कामोर्तब केलं. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती दिली.