Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

जेट एअरवेजचे दोन पायलट निलंबित

रियाध मध्ये टॅक्‍सीवे वरूनच विमान उडवण्याचा प्रयत्न 
मुंबई – रियाध विमानतळावरील मुख्य धावपट्टीवर विमान न नेताच त्याला समांतर असलेल्या टॅक्‍सी वे वरूनच विमानाचे उड्डाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेट एअरवेजच्या दोन वैमानिकांना नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी निलंबित केले आहे. हे विमान उडवण्याचा प्रयत्न या वैमानिकांनी अगदी शेवटच्या क्षणी सोडून दिला त्यामुळे विमान टॅक्‍सी वे वरून घसरले. त्यामुळे विमानातील 148 प्रवासी थोडक्‍यात बचावले. हा प्रकार 3 ऑगस्ट रोजी घडला होता.

या घटनेच्या संबंधात माहिती देताना नागरी विमान वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की टॅक्‍सी वे वरून त्यांनी हे विमान उडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा टॅक्‍सी वे वर पुढील भागात एक बॅरिकेट लावण्यात आल्याची सूचना या वैमानिकांना देण्यात आल्यानंतर त्यांनी विमान उड्डाणाचा बेत रहित केला. पण विमानाला अचानक ब्रेक लावल्यामुळे हे विमान टॅक्‍सीवे वरून घसरले होते.

रियाधच्या अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर या दोन्ही वैमानिकांचे विमान चालवण्याचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या परवान्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button