जळगावात दानवे-महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांचा मोठा राडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/6-8.jpg)
जळगाव |महाईन्यूज|
जळगावच्या भाजप जिल्हाध्यक्ष निवडणुकीत मोठा वाद झाल्याचं समोर आलं आहे. रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस सुनिल नेवे यांना मारहाण करण्यात आली तर सुनील नेवे यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. दोन घटांनी घोषणाबाजी करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून शाई फेक केली.
आज केंद्रीय राज्य मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थिती जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्षांची निवड होत होती. निवड प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. यात हाणामारी झाली आहे. भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून हा वाद झाला. भुसावळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले, त्यावेळी हा गोंधळ झाला. यात भाजपचे सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आली आहे. सुनील नेवे यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
काय आहे वाद
भुसावळात भाजपा शहराध्यक्षपदाची निवड बेकायदेशीररित्या झाल्याने भाजप पदाधिकारी नाराज आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे आरोप होत आहे. भुसावळ शहराध्यक्ष निवडीसाठी 11 जण इच्छुक होते. इच्छुकांपैकी कोणाचीही निवड न झाल्याने संताप झाला आहे. यावरूनच आज जिल्हाध्यक्ष निवडीत हा वाद झाला आहे.