Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चंद्रकांतदादा, माझ्याविरोधात लढा : राजू शेट्टींचे आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/raju-shetti-chandrakant-e1530947476706.jpg)
कोल्हापूर : – हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यासाठी नवनवी नावे चर्चेत येत आहेत. यासंदर्भात, छेडले असता वेगवेगळी नावे सुचवण्यापेक्षा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच माझ्याविरोधात लढावे, असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी दिले. २७ ऑकटोबर रोजी स्वाभिमानी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे होणार आहे. त्याच्या जागृतीसाठी जयसिंगपूर येथे झालेल्या सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले उसाच्या एफआरपीच्या शासनाने बेकायदेशीर दुरुस्ती केली आहे. त्याविरोधात रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढाईही लढली जाणार आहे. गेल्यावर्षी कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नाही त्यांच्याविरोधात मोर्चा काढल्यानंतर संचालकांनी कारवाई सुरु केली. मात्र सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या कारवाईला स्थगिती दिली. दूध आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले. कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीतून कारवाई केली तर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असा इशाराही त्यांनी दिला. माझ्या प्रश्नांवर विरोधक निरुत्तर होतात, म्हणून शेवटी माझी जात काढली जाते, असा आरोपही त्यांनी केला.