Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
गांधी परिवाराला धोका कमी झाला हे नक्की कोणाला वाटतं ?; शिवसेना
मुंबई | महाईन्यूज
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली असून केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे. ‘आयबी’ आणि ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी कुटुंबाच्या जिवाला असणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत आढावा घेतल्यानंतरच सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणं होतं. आता यावर शिवसेनेनं सवाल उपस्थित केला आहे.
गृहमंत्रालयाने असे ठरवले की, गांधी परिवाराला असलेला धोका कमी झाला आहे. गृहमंत्रालयास वाटते म्हणजे नक्की कुणास वाटते? असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.





