कोकणात ओला दुष्काळ…शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी- आदित्य ठाकरे
सिंधुदुर्ग । महाईन्यूज । ऑनलाईन टीम ।
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोकणातील ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील भातशेतीच्या नुकसानीची आणि मच्छिमार नुकसानीची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या अडचणीतील शेतकऱ्यांसोबत आणि मच्छिमारांसोबत संवाद साधून त्यांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेतल्या.
अवकाळी पावसामुळे राज्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि मच्छिमारांनी खचून न जाता शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असा धीर आणि विश्वास आदित्य ठाकरे यांनी त्यांना दिला.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार रविंद्र वायकर, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर आदी उपस्थित होते.





