Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोकणातील गणेशोत्सवासाठी रत्नागिरी पोलीस प्रशासनाने जारी केल्या गाईडलाईन्स

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्यानं कोकणवासियांना गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार. कोकणातील गणेशोत्सव परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस प्रशासनाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्या गाईडलाईन्स पाळूनच कोकणवासियांना गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करावे लागणार आहे.

कोकणात अनेक गावात गणपती हे डोक्यावरुन आणण्याची परंपरा असून गावातील सर्व घरगुती गणपती एकत्र आणले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदा गणपती आगमनादरम्यान गर्दी करु नका, असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी केले आहे.

गणपतीच्या आगमनासाठी गर्दी करु नका, एकमेकांच्या घरी जाणे, आरती करणे या गोष्टी टाळाव्यात. कोणतीही आगमन अथवा विसर्जन मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन प्रविण मुंढे यांनी केले आहे. पोलिसांवर कायद्याचा बडगा उगारण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्या, असेही मुंढे म्हणाले.

कोकणातील गणेशोत्सवासाठी जारी केलेल्य़ा गाईडलाईन्स

  • सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी नाही
  • घरगुती गणेश मूर्ती शक्यतो शाडूच्या असाव्यात.
  • घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिमरित्या घरीच करावे
  • सार्वजनिक गणेशमूर्ती जास्तीत जास्त चार व्यक्तीने वाहनातून जाऊन करावे.
  • सार्वजनिक गणपतीच्या आरतीसाठी जास्तीत जास्त चार लोक सोशल डिस्टन्सिंग ठेवून एकत्र येऊ शकतात.
  • घरगुती गणपतीच्या आरतीसाठी घरातील व्यक्तींनी सहभागी व्हावे
  • पारंपारिक पद्धतीने एकमेकांच्या घरी जाणे टाळा.
  • आगमनासाठी गर्दी करु नका

त्याशिवाय यंदा गणपती विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून मूर्तीचे संकलन केले जाणार आहे. विसर्जनासाठी प्रशासनाकडून पेंडॉलही उभे केले जाणार आहेत. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी आरती करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात गर्दीची शक्यता असल्याने कोरोना संसर्गाचाही धोका आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना नियमावलीचे पालन, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करणारा एक व्हिडीओही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोस्ट केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button