औरंगाबाद महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून मुंडेंच्या जागी संपर्कप्रमुख म्हणून ‘या’ नेत्याची नियुक्ती
![In the presence of Sharad Pawar in Solapur, the NCP is in turmoil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/ncp1.jpg)
औरंगाबाद | प्रतिनिधी
औरंगाबाद महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. लवकरच महापालिका निवडणुका होणार असून, त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद पालिका निवडणुकीआधी जिल्ह्यात मोठा बदल केला असून, धनंजय मुंडे यांच्या जागी आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुखपद याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे होती.
मराठवाड्यातील निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे असायची, मात्र आता राष्ट्रवादीकडून मोठा बदल करण्यात आलेला आहे. कोरोना काळातील कामगिरीमुळे राजेश टोपे यांची सर्वसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झालेली असल्याने, त्यांच्या चांगल्या छबीचा फायदा व्हावा, यामुळे राजेश टोपेंची संपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान, दुसरीकडे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांची इच्छा असल्याचंही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलेले आहे.
वाचा- ममता बँनर्जी यांच्या भूमिकांमुळे पश्चिम बंगाल बर्बाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी