Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आम्हाला न्याय द्या, अथवा कोरोना संसर्गाची लस द्या’, आंदोलकांची अजब मागणी

बीड |महाईन्यूज|

आमच्या कुटुंबाला न्याय द्या, नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लस द्या’, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे होमटाऊन अर्थात परळीतून या मागणीने जोर धरला आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्रासमोर 500 प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसऱ्या दिवस आहे. आमच्या कुटुंबाला न्याय द्या, नाही तर कोरोना रोगाच्या संसर्गाची लस द्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. उपोषणास कुटुंबासह महिला व लहान मुले देखील बसले आहेत. अनेक वेळा उपोषण करून देखील न्याय मिळाला नाही. प्रशासनाने अद्याप कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाला न्याय द्या नाही, तर कोरोना रोगाच्या संसर्गाची लस द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button