अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान- चंद्रकात पाटील
![Ashok Chavan's statement regarding Maratha reservation is ignorance - Chandrakat Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/chandrakant-patil.jpg)
नवी दिल्ली – ”अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे. केंद्र सरकार मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील नवी दिल्ली दाखल झाले आहेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता.
वाचा :-भंडाऱ्यातील सरकारी रुग्णालयात आग, १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू
विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारने यंत्रणा कशी वापरली, याची माहिती पुण्यात पत्रकार परिषद घेऊन देणार आहे. सरकारच्या विरोधात पत्रकार परिषद सोमवारी घेणार असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं आहे. जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौरा करणार होते, परंतु तो दौरा रद्द असल्याने सर्व माहिती दिलीय. औरंगाबादचं संभाजी नगर नाव करावे, यासाठी आमचा संघर्ष कायम राहील. सरकारने तसा प्रस्ताव आम्हाला दिल्यास आम्ही नाव बदलू, असंही चंद्रकांत पाटलांनी अधोरेखित केलं आहे.
वाचा :-मुख्यमंत्र्यांकडून भंडाऱ्यातील घटनेच्या चौकशीचे आदेश
तत्पूर्वी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाला संवैधानिक संरक्षण देण्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावेत, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यालाच आता चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.