Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर राज ठाकरेंचे नवीन व्यंगचित्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/raj-amit.jpg)
मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, याच भेटीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘भेट आणि मन की बात’ असे या व्यंगचित्रात लिहिले असून अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसतना दाखवले आहे.