Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई
…अन खवळून जाता भस्म कराया, उघडीन “तीसरा ” डोळा गं …: आमदार अमोल मिटकरी

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लावणीतून उत्तर दिले आहे.
मिटकरी यांनी ट्विटर वर म्हटले आहे की, तीन पक्षाच्या आघाडी सरकारवर निरर्थक टिका करण्यात स्वारस्य मानुन आपली राजकीय अस्वस्थता सिद्ध करणाऱ्या या दोन्ही महानुभावांच्या सवालांना लावणीतुन खास जबाब
” तीन डोळ्यांची आम्हा देणगी l
भाव मनामध्ये भोळा गं ll
अन खवळून जाता भस्म कराया l
उघडीन “तीसरा ” डोळा गं ll





