क्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे दुसरे राज्य पंच शिबिर उत्साहात!

राज्यातील विविध ठिकाणांहून शिबिरास एकुण ९० जण पंच सहभागी

पिंपरी-चिंचवडः महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ आयोजित पिंपरी-चिंचवड येथे दुसरे राज्य पंच शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरास एकुण ९० जण कोल्हापूर , सांगली ,सातारा , मुंबई , पुणे , जळगाव,अहमदनगर , ठाणे , कल्याण, पुणे, धाराशिव, सोलापूर ,नाशिक या जिल्ह्यातील पंच सहभागी झाले होते.

या शिबिरास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, हनुमंतभाऊ गावडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदिप भोंडवे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विलास कथुरे , मेघराज कटके , भारत केसरी पै विजय गावडे, युवा नेते संदिप पवार दिलीप बालवडकर, बाबासाहेब तांबे, संदिप नेवाळे, माऊली नढे,राजाभाऊ जाधव, गोरख पवार, सहादू गुजर, दिगंबर वाघेरे, बाबू चिंचवडे,अरूण तांबे, विजय नखाते, ताराचंद कलापुरे, सदाशिव नेवाळे, पंडित मोकाशी, गणेश काशिद, विजय कुटे, निवृत्ती काळभोर, बाळासाहेब काळजे, जयराम नाणेकर, अनिल गावडे ,अमित पांढारकर, आदी कुस्तीगीर संघाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी हनुमंत गावडे मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. दर सहा महिन्यांनी अथवा वर्षभरात युनायटेड वर्ल्ड रेसलिंग चे नियमात बदल होत असतात, या अनुषंगानेच हे शिबीर आपल्या शहरात घेण्याचा मान आम्हास मिळाला याबद्दल मनापासून धन्यवाद देतो, आणि सर्व महाराष्ट्रातील पंचाना आणखी कुस्ती वाढीसाठी सहकार्य करू असे आश्वासन देऊ केले. यानंतर संदिप भोंडवे यांनी आगामी वर्षभरात आधुनिक पध्दतीचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

बरोबर सकाळी १०: ३० वाजता शिबीराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करून शिबिरास सुरूवात झाली. यावेळी, आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणी पंच प्रा.दिनेश गुंड( सर)यांनी या शिबिरातील पंचांना कुस्तीगीरांचे वजन घेणे , गुणदान पद्धत ,निष्क्रियता, पॅरिस ऑलिंपिक साठी भारतीय मल्लांना मिळणारी संधी , चित्राफिती द्वारे कुस्ती नियमांचे मार्गदर्शन केले .५८ आंतरराष्ट्रीय स्पर्धा , १५० हून अधिक राष्ट्रीय स्पर्धा आणि २० वर्षातील राज्य अजिंक्यपद स्पर्धा इतका प्रचंड अनुभवाच्या द्वारे सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले .

तसेच पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री हनुमंतभाऊ गावडे , पै विजय गावडे , पै संतोष माचुत्रे यांनी शिबिराचे आयोजन केले. आयोजकांनी शिबिरासाठी वातानुकूलित हॉल तसेच उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केल्याने सर्व तांत्रिक अधिकारी समाधानी होते .
पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने भारत केसरी विजय गावडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आधुनिक युगातील आधुनिक कुस्तीचा वेग मंदावता कामा नये, म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास सर्वतोपरी मदत, सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल. तसेच दरवर्षी याच ठिकाणी पंच शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष माचुत्रे यांनी केले, तर आभार काळूराम कवितके यांनी मानले..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button