breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

वन मॅन आर्मी मॅक्सवेलने ठोकले द्विशतक! ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

World Cup 2023 : विश्वचषकाच्या ३९ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा ३ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात वन मॅन आर्मी ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या जबड्यातून खेचून आणला आहे. मॅक्सवेल हा जखमी असतानाही त्यांने जबरदस्त खेळी केली. २९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकट्या मॅक्सवेलने २०१ धावांची नाबाद खेळी केली आहे.

अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत सात गड्यांच्या मोबदल्यात २९१ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून इब्राहीम झद्रान याने सर्वाधिक १२९ धावांची शतकी खेळी केली. राशिद खान यान नाबाद ३५ धावा केल्या. रहमतने ३० धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने २६ रन्स केल्या.

हेही वाचा – मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न बघावेः खासदार रामदास तडस

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ९१ धावांत सात विकेट गमावल्या होत्या. यानंतर मॅक्सवेलने पॅट कमिन्ससोबत २०२ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने विजयी षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. तसेच या सिक्ससह ग्लेनने द्विशतकही पूर्ण केलं. ग्लेनने 128 बॉलमध्ये २१ चौकार आणि १० सिक्ससह नाबाद २०० धावा केल्या. तर पॅटने ६८ बॉलमध्ये नॉट आऊट १२ रन्स केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button