breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुर भांडारकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

‘सर्किट’ चित्रपटाची प्रस्तुती आणि निर्मिती मधुर भांडारकर यांनी केली

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणाऱ्या मधुर भांडारकर यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. आकाश पेंढारकर दिग्दर्शित ‘सर्किट’ या चित्रपटाची प्रस्तुती आणि निर्मिती मधुर भांडारकर यांनी केली आहे.

अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही नवी जोडी ‘सर्किट’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मधुरा भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनचे पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनचे प्रभाकर परब यांनी केली असून स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत.

समाजातील दाहक वास्तव आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा हातखंडा आहे. ‘चांदनी बार’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘फॅशन’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून मधुर भांडारकर यांनी समाजातील विविध क्षेत्रांतील सत्यस्थिती मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button