ताज्या घडामोडी

Lok Sabha Election 2024 – वंचितकडून तिकीट, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाची पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रविवारी दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये रमेश बारसकर यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

वंचित बहुजन आघाडीने रविवारी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून माढ्यातून रमेश बारसकर यांना उमेदवारी दिली आहे. रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचितकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

हे वाचा – महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत, सुटकेविरोधातील याचिकांवर हायकोर्टात आज सुनावणी

दरम्यान, अजित पवार गटातील नेते, मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क अलिकडच्या काळात वाढला होता. ही बाब लक्षात घेता, त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीने दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamana_online)

​  

​राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रविवारी दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये रमेश बारसकर यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडीने रविवारी 11 उमेदवारांची 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रविवारी दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये रमेश बारसकर यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

वंचित बहुजन आघाडीने रविवारी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून माढ्यातून रमेश बारसकर यांना उमेदवारी दिली आहे. रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचितकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

हे वाचा – महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत, सुटकेविरोधातील याचिकांवर हायकोर्टात आज सुनावणी

दरम्यान, अजित पवार गटातील नेते, मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क अलिकडच्या काळात वाढला होता. ही बाब लक्षात घेता, त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीने दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamana_online)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button