breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘बाळासाहेबांंच वचन पूर्ण करणार’, ‘मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवणार’ – उध्दव ठाकरे

मुंबई, महाईन्यूज

बाळासाहेबांना मी एक वचन दिलंय. एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवणार. बाळांसाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्याची शपथ घेतली आहे. आपल्याला युतीसाठी काम करायचं आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे स्पष्ट करून शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीबाबत सुरू असलेल्या उलट सुटल चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तरी, भाजप आणि शिवसेना किती जागा वाटून घेणार हा नवीन पेच आता कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे.

मुंबई येथील रंगशारदा याठिकाणी शिवसेनेचे २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांची शनिवारी (दि. 28) बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची भूमिका मांडली.

ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेची स्थापना कुठलाही मुहूर्त किंवा काळ बघून झालेली नाही. एकीकडे देश चंद्राकडे झेप घेत आहे. मंगळावर पाणी शोधतोय आणि आपण अजून पत्रिकेत मंगळ शोधत बसलोय. आयुष्य बदलण्याची जर कोणत्या खड्यामध्ये ताकद असेल, तर जिवंत माणसांमध्ये ती ताकद का नसेल.” “बाळासाहेबांना जाताना मी एक वचन दिलंय. एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवणार. बाळांसाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button