breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown | देशात जवळपास १७० जिल्हे करोना हॉटस्पॉट

नवी दिल्ली | करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले आहे. पहिला हॉटस्पॉट जिल्हे, दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

देशातील जवळपास १७० जिल्हे हॉटस्पॉट घोषित केले जातील. तर हॉटस्पॉट नसलेले २०७ जिल्हे आहेत. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी आज देशातील विविध राज्यांचे पोलीस महासंचालक, आरोग्य सचिवालय, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. खासकरून राज्यांमध्ये ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत त्या राज्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी कॅबिनेट सचिवांनी चर्चा केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button