breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown |जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला

श्रीनगर | जम्मू आणि काश्मीरमध्येही कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. सगळे व्यवहार बंद आहेत. कुणालाही घराबाहेर पडता येत नाही. अशाही परिस्थितीत तिथे दहशतवादी हल्ले होत आहेत. किश्तवार जिल्ह्यातल् दाचन भागात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या एका पथकावर हल्ला केला. यात एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला. दहशतवाद्यांनी त्यांच्याकडच्या बंदुका पळवून नेल्या आहेत. सगळीकडे बंद असतानाही दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्याबद्दल आश्चर्य व्यक्ते केलं जात आहे.

गेले काही दिवस ताबा रेषेवर पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारतही त्याला जोरदार प्रत्युत्तर देतोय. जम्मू काश्मीर जवळच्या केरन सेक्टर जवळ पाकिस्तानच्या हद्दीत असलेले दहशतवाद्यांचं एक लाँचपॅड भारताने जबर कारवाई करत उद्धवस्त केलं. या कारवाईत पाकिस्ताने 15 सैनिक आणि 8 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त ‘हिंदुस्थान टाईम्स’ने दिलं आहे. 10 एप्रिलला ही कारवाई करण्यात आली होती. पाकिस्तानला हा मोठा दणका मानला जातोय.

दरम्यान, सर्व जग कोरोनाविरुद्ध लढत असताना पाकिस्तान सीमेवरची आगळीक काही कमी करत नाही. काहीतरी कुरापत काढून तो दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्जिकल स्ट्राईक नंतरही पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. दहशतवद्यांचे काही लाँच पॅड्स पुन्हा सक्रिय करण्याचा त्यांचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button