breaking-newsराष्ट्रिय
फास्ट टॅग असेल तरच मिळणार टोलमध्ये सवलत
नवी दिल्ली – डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने फास्ट टॅगच्या नियमात सुधारणा केली आहे. त्यामुळे २४ तासांत परत येणाऱ्या वाहनांना दिली जाणारी टोलसवलत यापुढे केवळ फास्ट टॅग असलेल्या वाहनांनाच मिळणार आहे. रोख टोल भरणाऱ्या वाहनांना ही सवलत आता मिळणार नाही.
फास्ट टॅगच्या या नवीन नियमानुसार टोल नाक्यावर २४ तासांत परत आल्यानंतर टोल सवलतीच्या कोणत्याही पावतीची गरज नाही. फास्ट टॅग असलेली वाहने २४ तासांत परत आल्यानंतर त्यांच्या खात्यातून सवलतीच्या दरात पैसे कमी होणार आहेत त्यामुळे ही सवलत फास्ट टॅगधारकांनाच मिळणार आहे. काही टोलनाक्यांवर मिळणार्या इतर टोलच्या सवलतींचीही फास्ट टॅगधारकांनाच मिळणार आहेत. फास्ट टॅगच्या लेनमधून विनाफास्ट टॅग वाहन गेले तर त्याला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.