breaking-newsपुणे

#lockdown:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर, बॅकलॉग परीक्षेचाही निर्णय

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा पारंपरिक लेखी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. विद्यापीठात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 46 हजार इतकी आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी याबात परिपत्रक जारी केलं आहे. “विद्यापीठाच्या सर्व परीक्षा लेखी पद्धतीने होणार आहेत. कोणत्याही अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाईन होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कसे असेल, किती गुणांची परीक्षा असेल हे ठरविण्यासाठी विद्याशाखांच्या समितींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय होईल”, असं डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले आहेत.

बॅकलॉग परीक्षेचाही निर्णय झाला

बॅकलॉग परीक्षेबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षाही लेखी होणार आहे. निकालासाठी 50 टक्के अंतर्गत गुण आणि 50 टक्के अंतिम सत्राची परीक्षा याचे मूल्यमापन केलं जाईल. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट यासाठी व्यवहार्यता तपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येईल. अंतिम वर्ष वगळता इतर सर्व विद्यार्थी पुढील वर्षासाठी पात्र ठरणार आहेत. बॅकलॉगसाठी पुढील सत्रात परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावं लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button