TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘करारनाम्यावर’ स्वाक्षरीसाठी ‘या’ तीन अधिका-यांना केले प्राधिकृत

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्याने स्थायी समितीची विहीत मुदतही संपुष्टात आली आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत करण्यात येणा-या संविदेवर ( वर), लेख्यांवर मुद्रा लावणे. त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी तीन उपायुक्तांना प्राधिकृत केले आहे. उपायुक्त अजय चारठणकर, चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत यांना प्राधिकृत केले. त्यापैकी कार्यालयात हजर असलेले दोन उपायुक्त आणि नगरसचिवांनी संविदेवर व लेख्यांवर मुद्रा लावणे, स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

यापूर्वी महापालिकेच्या प्रत्येत संविदेवर, लेख्यांवर स्थायी समितीच्या दोन सदस्यांच्या उपस्थितीत महापालिकेची सामान्य मुद्रा लावण्यात येत होती. याचे दर्शक म्हणून या दोन सदस्यांच्या त्यावर स्वाक्ष-या करण्यात येत होत्या. तथापि, महापालिकेची विद्यमान मुदत 13 मार्च रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची पर्यायाने स्थायी समितीची विहीत मुदतही संपुष्टात आली आहे. त्यामुळे संविदेवर व लेख्यांवर मुद्रा लावणे. त्यावर स्वाक्षरी करणे यासाठी आयुक्तांनी प्राधिकृत केलेला असेल असा महापालिका उपायुक्ताच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिका-याची नियुक्ती करणे आवश्यक होते.

त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्पत करण्यात येणा-या संविदेवर व लेख्यांवर मुद्रा लावणे. त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी उपायुक्त अजय चारठणकर, चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत यांना प्राधिकृत केले. या तीन उपायुक्तांपैकी कार्यालयात उपस्थित असलेल्या कोणत्याही दोन उपायुक्तांनी व नगरसचिवांनी संविदेवर व लेख्यांवर मुद्रा लावणे. त्या स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button