breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रिया चक्रवर्तीची जामीन याचिका फेटाळल्यामुळे सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ड्रग्जचा मुद्दा समोर आला आहे. याबाबत गेले तीन दिवस सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु होती. आता या चौकशीनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने (NCB) रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. रियाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. कोरोनाची तपासणी केली गेली, ती नकारात्मक आली. त्यानंतर रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रियाला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

रियाविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 सी आणि 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांखाली शिक्षा 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत असू शकते. या कायद्याच्या कलम 29 चा संदर्भही आहे, जो गुन्हेगारी कारस्थान मानला जातो. रिया चक्रवर्तीच्या अटकेबाबत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, ड्रग पेडलरसोबत तिचे संबंध होते, म्हणूनच तिला अटक केली गेली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या चौकशीत सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग प्रकरणामध्ये रियाचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button