महिलांना मिळतात १५०० रुपये, तुम्हाला माहीती आहे का ‘ही’ योजना..
![Women get Rs.1500](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/indian-women-780x470.jpg)
राज्य सरकार राज्यातील महिलांसाठी अनेक योजना राबवते. यापैकीच एक योजना ‘जननी सुरक्षा योजना’ आहे. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र आहेत. या योजनेच्या लाभार्थी महिलांना बँक खात्यावर डीबीटी, पीएफएमएसद्वारे, धनादेशाद्वारे लाभ देण्यात येतो.
ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीची प्रसूती घरी झाल्यास ५०० रुपये मिळतात.
शहरी भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासनमान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास ६०० रुपये मिळतात.
ग्रामीण भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासनमान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास ७०० रूपये मिळतात.
सिझेरिअन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस १५०० रुपये मिळतात.
योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे जोडावी लागतात. प्रसूती सेवा उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय आरोग्य संस्था व शासन मानांकित खासगी आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रसुतीनंतर ७ दिवसांच्या आत सेवा दिली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या आशा, आरोग्यसेविका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन राज्य शासनाकडून केलं जातं.