Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस
वाहनचालक, नागरिकांची धावाधाव : गारांनी दुचाकीस्वारांना झोडपले
पिंपरी: दिवसभर उन्हाची काहिली झालेली असताना सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. गारांच्या माऱ्याने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांनी चांगलीच धावपळ झाली.
उकाड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडकरांची लाहीलाही झाली होती. सोमवारी दिवसभर उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले. मात्र, सायंकाळी आकाशात ढग दाटून आले. जोरदार वारा वाहू लागला आणि गारांचा पाऊस सुरू झाला.
दरम्यान, अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिंपरी-चिंचवड आणि परिसरात गारवा निर्माण झाला असून, चाकरमान्यांची मात्र दैना उडाली आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आणि जुन्या रस्त्यांवरील अंडग्राउंड बायपासमध्ये पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.








