Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दोषींना सोडणार नाही! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कडक शब्दात इशारा….

दिल्ली :  लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण दिल्ली हाय अलर्टवर आहे. तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अनेक तासांच्या तपासानंतर हे स्पष्ट झाले आहे की लाल किल्ल्यावरील कार बॉम्ब स्फोट हा दहशतवादी हल्ला होता, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याबाबत इशारा दिला आहे.

संरक्षण मंत्री यांनी सर्वात आधी स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. दिल्लीत झालेल्या स्फोटाला जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. नवी दिल्लीत आयोजित केलेल्या संरक्षणविषयक कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा –  ‘नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा’; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

ते पुढे म्हणाले की, सर्व प्रमुख यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच या मागचे कारण समोर येईल, असे संरक्षणमंत्री सिंह यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, “तपास संस्था या घटनेची जलद आणि सखोल चौकशी करत आहेत आणि लवकरच अहवाल सार्वजनिक केला जाईल. मी देशवासीयांना खात्री देऊ इच्छितो की देशातील प्रमुख संस्था या अपघाताची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. तपासाचे निकाल लवकरच समोर येतील आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत-किंमतीत सोडले जाणार नाही, त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल.” असे राजनाथ सिंह म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button