Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गांपैकी शैलपुत्री देवीची पूजा का केली जाते?

Navratri 2023 : हिंदू पंचागानुसार, १५ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. या दिवशी दुर्गेचे पहिले रूप माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी सर्वप्रथम कलशाची स्थापना विधीपूर्वक केली जाते. त्यानंतर, दुर्गा मातेचे आवाहन आणि स्थापना तसेच अभिषेक केला जातो, त्यानंतर शैलपुत्रीची पूजा केली जाते.

माता दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री म्हणून ओळखले जाते. नवदुर्गांपैकी ती पहिली दुर्गा आहे. माता पार्वतीला शैलपुत्री असेही म्हणतात. पर्वतराज हिमालयाच्या घरात ती कन्येच्या रूपात असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले.

हेही वाचा – अंघोळीची गोळी संस्थेचा पुणे शहरात खिळेमुक्त झाडं उपक्रम

सर्वप्रथम पूजेचा आढावा घ्यावा आणि घटस्थापनेनंतर माता शैलपुत्रीची पूजा करावी. त्यांना अक्षता, पांढरी फुले, धूप, दिवा, फळे, मिठाई अर्पण करावे. पूजेदरम्यान मंत्रांचा जप करा आणि नंतर माता शैलपुत्रीची पूजा करा. माता शैलपुत्रीला दुधापासून बनवलेली मिठाई अवश्य अर्पण करा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button