breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

हॅलोवीन जगभरात साजरा का केला जातो? काय आहे इतिहास? वाचा सविस्तर..

Halloween Festival : गेल्या आठवड्यापासून एक गोष्ट निदर्शनास आली असेल. ती म्हणजे जिकडे तिकडे तुम्हाला हॅलोवीनची क्रेझ पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की बरेच वेगवेगळ्या जण भोपळा, रक्त आणि भुतांची सजावट करत आहेत. तसेच बरेच जण भुतांचा वेष परिधान करून फिरताना देखील पाहायला मिळतंय. तर जाणून घेऊयात सध्या सगळीकडे चर्चा सुरू असलेल्या हॅलोविन या सणाचा काय आहे इतिहास?

हॅलोविन या सणाच्या नावाबाबत विचार केला तर हे नाव मध्ययुगीन ख्रिश्चन धमातून समोर आलेलं पाहायला मिळतंय. हॅलोवीन या शब्दात देखील मोठा अर्थ दडला आहे. इंग्रजी भाषेत हॅलो शब्दाचा अर्थ हा होली असा होतो. ख्रिश्चन धर्मांनुसार होळी या शब्दाचा अर्थ होतो पवित्र, आणि याच नावाकडे ख्रिश्चन धर्माप्रमाणे पाहिल्यास त्याचा अर्थ हा संत असा देखील होतो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला म्हणजेच १ नोव्हेंबरला ख्रिश्चन धर्मीयांमध्ये ‘ऑल ईव्ह डे’ साजरा केला जातो. १ नोव्हेंबरच्या आदल्या दिवशी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी इव्हिनिंग मासचे देखील आयोजन केले जात असते. यालाच त्यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर ‘ऑल हॅलोज ईव्ह’ असे म्हणतात. ‘ऑल हॅलो ईव्ह’ बाबत संक्षिप्त रूपात बोलायचं झालं तर त्यालाच आपण हॅलोवीन म्हणून ओळखतो.

हेही वाचा – भारत आणि श्रीलंका क्रिकेट सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही 

हॅलोवीन सणाचा इतिहास काय?

हॅलोवीन या सणाबद्दल बोलायचं झालं तर हा सण जगातील सर्वात जुन्या सणांपैकी एक मानला जातो. मृत आणि जिवंत व्यक्ती यांच्यामध्ये असणार नातं जगाला सांगणारी ही एक अतिशय जुनी परंपरा आहे. एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे काय होते? त्याचा पुढील प्रवास काय असतो? त्या मृत व्यक्तीबाबत जिवंत मानवांनी आदर कसा ठेवायचा? काही व्यक्तींचे अतृप्त असे आत्मे मागे का घुटमळत राहत असतात? या सर्व गोष्टींचा उल्लेख जगामध्ये असणाऱ्या जवळपास सगळ्याच संस्कृतीत केलेला आपल्या पाहायला मिळतो. आणि कदाचित याच कुतूहलातून या संकल्पनेवर आधारित असलेल्या सणांची निर्मिती झाल्याचे आपल्या निदर्शनास येतंय.

आयर्लंडमध्ये ‘केल्टिक फेस्टिव्हल ऑफ साओएन’ हा आदिवासींचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सणापासूनच हॅलोवीनचा उगम झाल्याचं बोललं जात आहे. या सणाबद्दल बोलायच झालं तर साओएन याचा उल्लेख केल्टिक संस्कृतीत मृतांचा देव असा केलेला आहे. कदाचित यामुळेच या सणाचं राक्षसीकरण करण्याचा प्रयत्न देखील अनेकदा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हॅलोवीनचा त्याच्याशी संबंध काय असेल तर हॅलोविन म्हणजेच या मृतांच्या देवाची मेजवानी. जवळपास अठराव्या शतकात एका ब्रिटिश इंजिनीअरने या साबाबत असणारे समाज गैरसमज आणि या सणाच्या मागे असणारी संस्कृती आणि भाषेच्या आतापर्यंत झालेल्या अपुऱ्या अभ्यासावर प्रकाश टाकला होता. कदाचित यानंतरच्या सणाचा संबंध थेट भयानकतेशी जोडला गेला होता. त्यानंतर एकोणिसाव्या शतकात या सणाचं पूर्णपणे ख्रिश्चनीकरण करण्यात आलं आणि जगभरातील चर्चनी ही परंपरा स्वीकारली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button