breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

भारत आणि श्रीलंका क्रिकेट सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही

IND vs SL : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पर्यावरणाच्‍या समस्‍येविरुद्‍ध लढण्‍यासाठी कटिबद्ध आहे, असे स्‍पष्‍ट करत भारत आणि श्रीलंका क्रिकेट सामन्‍यानंतर मुंबईत वानखेडे स्‍टेडियमवर. विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्‍हटले आहे.

एका निवेदनात जय शहा यांनी म्‍हटले आहे की भारतातील सर्वोच्‍च क्रिकेट संस्‍था ‘बीसीसीआय’ पर्यावरणाबाबत संवेदनशील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोणतेही फटाके फोडण्‍यात येणार नाहीत, असा निर्णय घेण्‍यात आला आहे.

हेही वाचा – सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांचं राज्य सरकारला खुलं आव्हान; म्हणाले.. 

बीसीसीआय पर्यावरणीय समस्यांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे. त्‍याचबरोबर चाहत्‍ये आणि भागधारकांच्या हितांना नेहमीच अग्रस्थानी ठेवले आहे. बीसीसीआयने मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेबाबत तातडीची चिंता मान्य केली आहे. आम्ही क्रिकेटच्या सेलिब्रेशनला साजेशा पद्धतीने आयसीसी विश्वचषक आयोजित करण्याचा प्रयत्न करत असताना, आमच्या सर्वांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्धतेवर आहोत, असेही जय शहा यांनी आपल्‍या निवदेनात म्‍हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button