प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारीचाच दिवस का? जाणून घ्या या दिवसाचे विशेष महत्व
![Why is 22nd January the only day for the coronation of Lord Shri Ram?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Ram-Mandir-Ayodhya-4-780x470.jpg)
Ayodhya Ram Mandir | आजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. कारण अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काही वेळात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील तयारी पूर्ण झाली आहे. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी आजचाच दिवस का नेमला हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या आजच्या दिवसाचे विशेष महत्व
आजच्या दिवसाचे महत्व काय?
अयोध्येच्या राम मंदिरात रामललाच्या अभिषेकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. २२ जानेवारी २०२४ हा अभिषेक दिन निश्चित करण्यात आला आहे. १६ जानेवारीपासून मूर्तीच्या अभिषेकाशी संबंधित सर्व विधी सुरू झाले आहेत.
हेही वाचा – लालकृष्ण अडवाणी श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, कारण काय?
तसेच अभिजित मुहूर्तावर शास्त्रीय परंपरेचे पालन करून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार असून अभिजीत मुहूर्त २२ जानेवारी रोजी दुपारी १२:२९ वाजून ८ सेकंद ते १२:३० मिनिटे ३२ सेकंदापर्यंत असेल. म्हणजेच प्राणप्रतिष्ठेची शुभ मुहूर्त हा फक्त ८४ सेकंद असेल.
या ८४ सेकंदाबाबत आणखी बोलायचे झाले तर, आज शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी सुरु होणार असून तसेच मंगळवार २३ जानेवारीला पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे.
परंतु २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजून ५१ मिनिटे आणि दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे २२ जानेवारी २०२४ चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.