breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

लालकृष्ण अडवाणी श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, कारण काय?

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडणार आहे. यानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सोहळ्याला राजकीय नेते, कलाकार, खेळाडू अयोध्या नगरीत दाखल झाले आहेत. मात्र राम मंदिर आंदोलनाचा खरा चेहरा, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी प्रणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीत.

लालकृष्ण अडवाणी यांचं श्री राम मंदिरासाठी मोठं योगदान राहिलं आहे. अडवाणी यांनी १९९० च्या दशकात राम मंदिर आंदोलन सुरू केलं होतं. अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली १९९० साली भाजपने गुजरातने सोमनाथ येथून राम रथयात्रा काढली होती. ‘मंदिर वही बनायेंगे’नारा देऊन लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदोलन सुरू केले. यामुळेच विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार आणि इतर अधिकारी स्वतः लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते.

हेही वाचा    –    ‘स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येचा दौरा रद्द केला आहे. खराब वातावरण आणि थंडीमुळे हा दौरा रद्द केला आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच भाजपचे दुसरे बडे नेते मुरली मनोहर जोशी प्राणप्रतिष्ठा समारंभात येणार नाहीत. मुरली मनोहर जोशी यांचे वय ९० वर्षे आहे.

अयोध्येत हवामान कसं?

अयोध्येत सकाळी ६ वाजता ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत थंडीचं वातावरण कायम राहणार आहे. कमीत कमी ७ अंश तर अधिक अधिक १६ अंश सेल्सिअस तापमान राहू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button