वसुबारस सण का साजरा करतात? काय आहे यामागचं महत्व..
![Why do Vasubaras celebrate festivals?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Vasu-Baras-780x470.jpg)
Vasu Baras | दिवाळी हा सर्वांचा आवडता सण असतो. या सणाला हिंदू धर्मात सर्वात जास्त महत्व आहे. या दिवाळी सणामध्ये पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे. अशातच हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने केली जाते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे.
वसुबारसचं महत्त्व काय?
गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन केलं जातं. गाईच्या पायावर पाणी घालून तिला ओवाळलं जातं. गंध लावला जातो. तसेच, चारा खायला दिला जातो. तिला गंध लावून गाईची पूजा केली जाते. तसेच, घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही गाईची पूजा करण्याचं महत्त्व आहे.
हेही वाचा – ‘मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती’; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवरून अजित पवारांची टीका
वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त :
आज सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपासून या सणाला सुरवात होणार आहे. तर मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ०५ वाजून ०४ मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे.