कोजागिरी पौर्णिमा नक्की कधी! जाणून घ्या शुभ मुहूर्त..

Kojagiri Purnima 2024 | शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर सर्व भाविकांना वेध लागतात ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमा ही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते. तसेच कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. मात्र यंदाच्या वर्षी नेमकी पौर्णिमा कधी आहे हे आज आपण जाणून घेऊयात..
कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी?
यंदाच्या वर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच १६ ऑक्टोबरला रात्री ८.४० वाजता सुरु होणार आहे. तर, ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४.५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानुसार, १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे.
हेही वाचा – ‘फडणवीसांचा सुफडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही’; आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा इशारा
कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत
अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंदिराचा देव्हारा नीट स्वच्छ करा. त्यानंतर लाल कपडा पसरवून त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो लावा. त्यानंतर देवीची पूजा सुरू करा. चंद्रोदयानंतर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर दूध किंवा खीरचा नैवेद्य दाखवून कुटुंबातील सदस्यांना दूध प्रसाद म्हणून द्या.
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व
शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण या दिवशी तिचा जन्म झाला होता. याला कोजागरी पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असेही म्हणतात. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. लोक श्रद्धेने त्याची पूजा करतात. या दिवशी चंद्र त्याच्या 16 टप्प्यांनी भरलेला असतो आणि त्याच्या किरणांनी अमृताचा वर्षाव होतो. त्यामुळे ती खीर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती देवी लक्ष्मीला अर्पण करून प्रसाद म्हणून खाल्ली जाते.
 
				 
 
 
 
 
 




