सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती आहे? जाणून घ्या फीचर्स
![What is the price of Porsche car which is currently in discussion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Porsche-Pune-780x470.jpg)
पुणे | पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेदरम्यान देशभरात पोर्शे कार चर्चेत आली आहे. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? या कारची किंमत आणि फीचर्स काय आहेत, तर आज आपण जाणून घेणार आहोत.
Porsche Taycan ही उत्तम फीचर्स असलेली कार आहे. ही कार ३०० kW किंवा ४०८ PS ची पॉवर जनरेट करते. पोर्श कारचा टॉप स्पीड २३० kmph आहे. तर ही कार ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी ४.८ सेकंद घेते. भारतातील पोर्शे SUV मध्ये Macan, Cayenne आणि Macan Turbo EV यांचा समावेश आहे.
हेही वाचा – ‘रेडझोन’ मोजणीला संरक्षण विभागाची परवानगी
पोर्शे कारची किंमत ८८.०६ लाख पासून सुरू होते आणि भारतात ही किंमत १.८६ कोटींपर्यंत आहे. सर्वात कमी किंमतीची कार Macan मॉडेलची आहे. जिची किंमत ८८.०६ लाख रुपये आहे. पोर्शेची सर्वात महागडी कार ९११ आहे ज्याची किंमत १.८६ कोटी रुपये आहे.